राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न
गडचिरोली जिल्हाच्या विकासासाठी भक्कमपणे पाठीशी उभा
मा.ना.श्री.देवेंद्रजजी फडणवीस
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री
सामान्य जनकल्याणासाठी कटिबद्ध व जिल्हाच्या विकासासाठी अनेक समस्या मार्गी लागणार मा.खा.अशोकजी नेते
दिं.०१ ऑक्टोंबर २०२२
गडचिरोली:-खा.अशोकजी नेते यांनी जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये जिल्हयाच्या विकासासाठी सामान्य जनकल्याणासाठी कटिबद्ध असून अनेक समस्या घेऊन विविध मागण्या मार्गी लागणार*..
मेडिकल कॉलेज, विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागेचे अधिग्रहण लवकरच!
– कोन्सरी प्रकल्पाला गती देणार, १८,००० कोटींची गुंतवणूक!मेडिगट्टासंदर्भात सर्वंकष पॅकेज तयार करणार
– गडचिरोली जिल्हा नियोजन समिती बैठकीत विविध विषयांचा आढावा
गडचिरोली:-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेडिगट्टा संदर्भात ज्या शेतकर्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात, त्यांचे अधिग्रहण करून जमीनीचे मूल्यांकन, झाडे असतील त्यासाठी वेगळे पॅकेज आणि आवश्यकता असेल तर सानुग्रह अनुदान असे सर्वंकष पॅकेज तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
वाहतुकीमुळे नागरिकांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी ‘मायनिंग कॉरिडॉर’ तयार करून त्यावरूनच वाहतूक होईल, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले
गडचिरोली जिल्ह्याची सत्र-२०२२-२३ ची जिल्हा वार्षिक नियोजन बैठक दिनांक ०१ऑक्टोंबर २०२२ रोज शनिवार ला जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली.
त्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेकरिता खासदार अशोकजी नेते यांनी शेतकरी, शेतमजूर, व सामान्य नागरिकांच्या विविध समस्या बाबत संबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री महोदय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचे प्रश्न रस्त्याचे प्रलंबित प्रश्न,आरोग्याचे प्रलंबित प्रश्न, लवकरात लवकर मार्गी लागणार गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अतिदुर्ग जिल्हा असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने एमआरआय (MRI)मशीन सुद्धा या गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या जाईल. तसेच कोणसरी प्रोजेक्ट संबंधी खनिजाचा जिल्ह्यातच प्रोसेसिंग करून या प्रोजेक्टद्वारे स्थानिक लोकांना लोकांना रोजगार मिळावा याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार अशोकजी नेते यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी,तसेच मेडिकल कॉलेज संबंधित जमीन अधिग्रहण करून लवकरात लवकर सुरू करण्यात यावे
आलापल्ली सिमेंट काँक्रीट रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावे. रेल्वे संबंधी सुद्धा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे.
जिल्ह्यात पाच बंधारे पैकी चिचडोह या एकच बंधारेचे काम पूर्ण झालेले असून कोटगल बॅरेजचे काम चालू आहे. तसेच चामोशी तालुक्यात कळमगांव,अहेरी तालुक्यात देवलवाही,आरमोरी तालुक्यातील मुलुर या ठिकाणच्या बंधारेच सुद्धा काम लवकरात लवकर चालू करावे
इत्यादी प्रश्न खा.अशोकजी नेते यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मार्गी लावण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केले
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, खासदार मा.अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष कीसनजी नागदेवते, जिल्हाधिकारी संजयजी मिना, आम.डॉ.देवरावजी होळी, आम.कृष्णाची गजबे,आम.धर्मराव बाबा आत्राम,आ.अभिजित वंजारी,ओबिसी विदर्भ संपर्क प्रमुख तथा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओलालवार,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,प्रदेश सदस्य सदानंदजी कुथे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस,आशिष पिपरे नगरसेवक चामोशी.तसेच अनेक पदाधिकारी विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.