राजेश हजारे व विजय सोमकुंवर यांच्यावर फौजदारी कारवाई करून निलंबित करा. — अधिसभा सदस्य गुरुदास कामडी
santoshbharatnews :- Gondwana university Gadchiroli चेन्नई प्रकरणी विद्यापीठात चौकशी आज दोषी आढळल्यास फौजदारी कारवाईची शक्यता गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या बाल बॅडमिंटन महिला संघाची चमू चेन्नई येथे खेळण्यासाठी गेली होती. या दरम्यान, संघाचे प्रशिक्षक राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोमकुंवर यांनी महिला खेळाडूंना संतापजनक वागणूक दिल्याची तक्रार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे ३० जानेवारीला विद्यार्थीनी खेळाडूंनी केली आहे. तक्रारीची दखल घेऊन विद्यापीठाने सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता संबंधितांना बुधवार, १ फेब्रुवारीला बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीनंतर सदर प्रकरणात राजेश हजारे व विजय सोमकुंवर यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी केली आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे बाल बॅडमिंटन खेळण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे महिला संघ गेले होते. या संघासोबत महिला प्रशिक्षक अथवा व्यवस्थापक देणे अपेक्षित असताना दोन्ही पुरुष देण्यात आले. असे असले तरी संबंधित पुरुष प्रशिक्षक व व्यवस्थापकांनी खेळण्यासाठी गेलेल्या मुलींसोबत संतापजनक वागणूक दिल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनींनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेऊन कुलगुरूंनी तत्काळ चौकशी समिती गठीत करून बुधवार, १ फेब्रुवारीला चौकशी समितीला पाचारण केले आहे. या संदर्भात तक्रारकर्त्या विद्यार्थिनींचे बयान चौकशी समितीला सदर प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असल्याचे समजते. ही समिती बुधवार एक फेब्रुवारीला संबंधितांची चौकशी करून योग्य अहवाल विद्यापीठाकडे सादर करणार आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन सदर प्रकरणात दोषी आढळून आल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे संकेत विद्यापीठाच्या सूत्रांनी वर्तविले आहे.
विशेष बाब म्हणजे, चेन्नई येथील बाल बॅडमिंटन संघासोबत देण्यात आलेल्या व्यवस्थापका संदर्भात १७ जानेवारीला झालेल्या सिनेट सभेमध्ये विजय सोमकुंवर यांच्यावरबंदी घालण्यासंदर्भात अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा होऊन विजय सोमकुंवर यांना ब्लॅक लिष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.. तरीही गोंडवाना विद्यापीठाने संबंधित कर्मचाऱ्यांना मुलींच्या संघासोबत विजय सोमकुंवर यांना का पाठविण्यात आले? असा प्रश्न अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी उपस्थितीत केला आहे ? विद्यापीठाच्या वर्तुळात अनेक तर्क – वितर्क उपस्थित केले जात आहेत. ‘सिनेट’मध्ये झालेल्या चर्चेनुसार सदर कर्मचाऱ्याला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीही विद्यापीठ प्रशासनाने सदर कर्मचाऱ्याला मुलींच्या संघासोबत पाठविण्याचे रहस्य काय? असा प्रश्न आता सर्वत्र चर्चिला जात आहे.