*वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या कुटुंबाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली भेट*
कळमटोला येथील कृष्णाजी ढोणे या शेतकऱ्यास वाघाने केले ठार
मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत केली आर्थिक मदत
किती आणखी किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर वाघाचा बंदोबस्त करणार
(Gadchiroli)गडचिरोली :-तालुक्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा नरभक्षक वाघाने दहशत निर्माण केली असून तालुक्यातील आणखी किती निष्पाप लोकांचा जीव गेल्यावर प्रशासन या वाघांचा बंदोबस्त करणार असा प्रश्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वन प्रशासनाला केला आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कळमटोला येथील कृष्णाजी ढोणे या मृतकाच्या परिवाराची भेट घेऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रामरतनजी गो, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, बूथ प्रमुख संभाजी ठाकरे ,देवानंद चलाख, रामचंद्र ढोणे बाबुराव कोरते, वसंत करकाडे ,नारायण ढोणे मनोहर ठाकरे ,विलास सहारे,बबनराव सूर्यवंशी यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे .जंगलाचा परिसर गावाला लागून असल्याने गावकरी आपला घराबहेरील कोणताही काम करण्यास घाबरू लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आपण वन प्रशासनाला केली आहे वन प्रशासन त्या कार्यात लागला देखील आहे. परंतु अजून पर्यंत त्यांना यश आले नाही ही दुःखाची बाब आहे .त्यामुळे वन प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन या वाघांचा बंदोबस्त करावा व निष्पाप लोकांचा जाणारा जीव वाचवावा असे आवाहन त्यांनी वन प्रशासनाला केले आहे.