मार्कंडा देवस्थानाचे काम मार्गी लावुन लवकरच सुरू करण्यासाठी दिल्ली येथे आढावा बैठक संपन्न! खासदार अशोक नेते यांनी पुरातन विभागाचे महानिदेशक यांना काम तात्काळ करण्याचे बैठकीत दिले निर्देश

127

मार्कंडा देवस्थानाचे काम मार्गी लावुन लवकरच सुरू करण्यासाठी दिल्ली येथे आढावा बैठक संपन्न!

खासदार अशोक नेते यांनी पुरातन विभागाचे महानिदेशक यांना काम तात्काळ करण्याचे बैठकीत दिले निर्देश

दिं. ११ ऑगस्ट २०२३

दिल्ली:-मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामसाठी दिल्ली येथे बैठकीला सर्व सोयीस्करपणे कामे पूर्ण व मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी खासदार अशोक नेते यांचा पुढाकाराने गडचिरोली मार्कंडा देवस्थानाच्या बांधकामाच्या निविदा संदर्भामध्ये काही अडचणी येत होत्या त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या व पाठपुरावा मिळवण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक जी नेते यांनी सतत वारंवार पाठपुरावा करीत होते परंतु सदर परवानगी व नाहरकत परवानगी मिळण्यासाठी काही अडचणी येत होत्या परंतु सदर समस्त अडचण खासदार अशोकजी नेते यांनी देशाचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा बैठकी दरम्यान लक्षात आणून दिले.खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भारतीय पुरातत्व विभागाचे महानिदेशक

डीजी चेअरमन के. के. बासा, एडीजी जानविश शर्मा, एडीजी डॉ. अलोकजी त्रिपाठी, संचालक सुंदर पाल, अधीक्षक अभियंता एस. के. कन्ना यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक संपन्न झाली व मंदिर बांधकाम निविदा प्रक्रिया बाबत अडचण दूर झाली.असुन मार्कंडा देवस्थानाच्या संदर्भातल्या कामासाठी दोन मटेरियल आणि मॅन पॉवर टेंडर प्रोसेसिंग पूर्ण झाली आहे. खासदार अशोक जी नेते यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये मार्कंडा देवस्थान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लाऊन मंदीर बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व समस्या दूर करावे.

असे निर्देश भारतीय पुरातन विभागाचे महानिर्देशक डीजी चेअरमन के.के.बासा,एडीजी जानविश शर्मा,एडीजी डॉ. अलोकजी त्रिपाठी, यांना खासदार अशोक नेते यांनी दिले.

 

मार्कंडा मंदिर देवस्थानाचे बांधकाम पूर्ण झाल्यास मार्कंडा देवस्थानातील भाविक भक्तांना सुद्धा सोयी सुविधा निर्माण होईल.व महाशिवरात्रीला भावी भक्तांना याचा लाभ निश्चितच होईल.असे वक्तव्य खासदार अशोक जी नेते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here