मार्कंडादेव येथे ”आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३, सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी-२०, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” भव्य मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ
खासदार अशोक नेते़ यांनी दिली भेट
दिं. १७ फेब्रुवारी २०२३
मार्कंडादेव:- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे आयुष्यमान भारत आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३ भारत सरकारच्या विकासाचे आठ वर्ष जी- २० स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भव्य मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना या देशाचे लाडके,विश्व गौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी आठ वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या विकासासाठी,देशाच्या कल्याणासाठी, सर्व सामान्य नागरिकांसाठी,शेतकरी शेतमजूर,गोरगरीब,शोषित,पिढीत वंचित,नागरिकांसाठी अशा अगणित केंद्र सरकारच्या योजना अमलात आणल्या.आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गतचा एक भाग म्हणून आज मार्कंडा देवस्थान या ठिकाणी भव्य मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनच्या माध्यमातून अशा या विविध केंद्र सरकारचे योजना सामान्य जनतेपर्यंतं,पोचवण्याचा माध्यम आहे. याकरिता मार्कंडा देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री यात्रा निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात.यासाठी या भव्य मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनेचा लाभ,व आयुष्यमान भारत योजनेचा फायदा, या यात्रेनिमित्ताने लाखो भाविक भक्तांना व्हावा असे आव्हान या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी या उद्घाटन प्रसंगी केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धापन उपक्रमाचा शुभारंभ व उद्घाटन या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने आज दिनांक १७ फेब्रुवारी पासून २१ फेब्रुवारी पर्यंत चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसर ”आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३ सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी २० व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या विषयांवर भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,प्रदेश सदस्य स्वप्नीलजी वरघंटे, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत, गटविकास अधिकारी सागर पाटील, तहसिलदार संजय नागटिळक,तसेच मोठ्या संख्येने प्रदर्शनीतील महिला व पुरूष उपस्थित होते
या प्रदर्शनात भारत सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र प्रदर्शन, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हीजन व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोलीद्वारे पुस्तकांचे प्रदर्शन, आरोग्य विभागाचे नागरीकांसाठी आरोग्य शिबिर,आरोग्याची माहिती सांगणारे विविध स्टॉल या ठिकाणी ठेवण्यात आले. आहे. तसेच विविध सरकारी विभागांचे विविध सरकारी योजनांची माहिती सांगणारे स्टॉल, तसेच गोंडवाना विद्यापीठातील एनएसएसचे विद्यार्थी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम,महिला व आर्थिक विकास महामंडळाद्वारे बचत गटातील महिलांसाठी आणि महिला व बालविकास विभाग, जि.प. गडचिरोली मार्फत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यासाठी पोष्टिक आहार स्पर्धा असे विविध माध्यमातून प्रचार व प्रसार प्रदर्शन नागरीकांसाठी निःशुल्क असून नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन खासदार अशोक जी नेते यांनी केले.