महिलेस विनयभंग करणा-या आरोपीला तीन महीने कारावास व २०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी श्री. आर.एन. बावणकर यांचा न्यायनिर्णय
S bharat news network
सविनय वृत्त असे आहे की, आरोपी नामे जगन्नाथ शिवकुमार बैरागी, वय ३६ वर्ष रा. एटापल्ली हमु पंदेवाही ता एटापल्ली जि गडचिरोली याने दिनांक २४/१०/२०१७ चे १८.०० वाजे दरम्यान मौजा पंदेवाही गावातील फिर्यादी पिडीता महिला हि माडीया गोंड जातीची आहे हे आरोपीला ज्ञात असतांना सुध्दा आरोपीने फिर्यादी ही संडासाचा मळवा घेवून ती गावाशेजारील जंगलात संडासला जात असतांना नमुद
आरोपी हा तिचे मागे जंगलात गेला तेव्हा फिर्यादी त्याला पाहुन घाबरुन आरोपी मागे येत आहे हे समजुन ती संडास न करता घरी परत येण्यास निघाली असता यातील नमुद आरोपी हा फिर्यादी हि एकटी असल्याची संधी साधुन फिर्यादीला रस्त्यावर अडवुन फिर्यादीचे केस पकडुन तोंड दाबले व तिचे छाती दाबुन ओढतान करुन फिर्यादीचा विनयभंग केला म्हणुन फिर्यादी महिला हिने आरोपी विरुध्द कायदेशीर तक्रार दिली
फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे एटापल्ली अप.क. ३६/२०१७ कलम ३४१.३५४ भादवी तसेच ३(२)(v), ३(१) (w) (1)x(II) अट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले
मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी याने स्पेशल केस क. २१/२०२३ मध्ये साक्षक्ष पुरावा घेतले असता फिर्यादी व साक्षीदार यांचे पुरावा व सरकारी पक्षाचे युक्तीवाद मा न्यायालयाने ग्राहय धरुन दिनांक १३/०९/२०२४ रोजी आरोपी नामे जगन्नाथ शिवकुमार बैरागी, वय ३६ वर्ष रा. एटापल्ली हमु पंदेवाही ता. एटापल्ली जि. गडचिरोली यास कलम ३५४ भादवी मध्ये तीन महीने कारावास २०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. एन एम भांडेकर यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री शशिकांत भोसले यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्भती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहीले