महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेसच्या अध्यक्षपदी डाॅ. नामदेव उसेंडी यांची निवड झाल्याबद्दल मुबंई येथे आदिवासी सेल कडुन सत्कार
गडचिरोली(gadchiroli)अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेेस च्या अध्यक्षपदी गडचिरोली जिल्हयातील काॅग्रेस पक्षाचे वरिष्ठ व अनुभवी नेते माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांची नियुक्ती केली आहे. निवड झाल्याबद्दल आदिवासी सेल मुबंई काॅग्रेस कमिटी तर्फे नवनिर्वाचीत आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी आदिवासी काॅग्रेस सेल मुबंई अध्यक्ष सुनिल कुमरे, गणेश तेली, सुनिल खरवी, देवु चिमडे, अंकुश वाघात, मोहन धाडगे, वसंत जाबर, सोमा गोवळकर, किरण चिमडे, हरिशचंद्र चोगदंडे, शकंर बली, सुरेश वारली, राजु बोंड आदि बहुसंख्येने उपस्थित होते.
डाॅ. नामदेव उसेंडी यांचे एम.बी.बी.एस., एम.डी., शिक्षण झालेले असुन काॅग्रेस पक्ष संघटनेत त्यांनी विविध पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सद्या ते प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. 2009 ते 2014 दरम्यान ते विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आले होते. 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली -चिमुर मतदारसंघातून काॅग्रेसचे उमेदवार म्हणुन त्यांनी निवडणूक लढवली होती. 2014 ते 2021 पर्यंत ते गडचिरोली जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. 1994 ते 1997 दरम्यान त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणुन काम पाहिले. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी व त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ते सतत कार्यरत असतात.
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेेसच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुकुल वासनिक, जैराम रमेश, अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, काॅग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री के.सी. पाडवी यांचे त्यांनी आभार मानले. पक्षाने माझ्यावर टाकलेल्या जबबादारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून आदिवासी समाजासाठी कार्य करु, तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन असे माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे.