भेंडाळा विश्र्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन
चामोर्शी : S bharat news network :- तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ सोमवारी ५ ऑगस्ट रोजी लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करून त्यांना शपथ देण्यात आली.त्यात शाळा नायक पार्थ शिर्गावर,शाळा उपनायक विवेक ठाकूर ,सहल प्रमुख मनिष साखरे,क्रीडा प्रमुख अरविंद आभारे व सांस्कृतिक प्रमुख कु. आरुषी सातपुते, स्वच्छ्ता प्रमूख हर्ष कडस्कर तर आरोग्य प्रमूख कू. रुद्राक्षी सातपुते यांची निवड मतदान पद्धतीने केली .त्यात निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून निवडणूक केंद्राची रचना करण्यात आली. त्या केंद्रामध्ये मतदान अधिकारी-1 म्हणून पिलारे सर यांनी काम पाहिले. तर मतदान अधिकारी-2 म्हणून आईंचंवार सर तर मतदान अधिकारी-3 म्हणून झाडे सर यांनी काम पाहिले तसेच मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष संतोष सुरावार सर यांनी काम पाहिलं .तर या निवडणूक केंद्राचं उद्घघाटन मुख्याध्यापक तथा प्राचार्य अरुण राऊत सर यांनी केले. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व शिक्षक उपस्थित होते.त्यामध्ये घरत सर, श्रीरामे सर ,बोरकर सर, पवार सर , नवघडे सर , चुधरी सर , कसनावार सर , धारणे सर , चौधरी सर,तसेच सातपुते मॅम ,ढगे,मॅम बंडावारमॅम ,उरकुडे मॅम यांनी सहकार्य केलं या सर्व निवडणूक प्रक्रियेची रचना मॅजिक बस फाउंडेशनचे शिक्षक प्रफुल निरुडवार यांनी केली व त्यांना मदत शाळेच्या क्रीडा शिक्षिका पडगेलवार मॅम यांनी केली.अशा प्रकारे विश्वशांती विद्यालयामध्ये प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने शाळेचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.