भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष,तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.के.सी.आर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटप
प्रतिनिधी मुलचेरा : येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष,भारत राष्ट्र समिती चे नेते, माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मूलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी आविस गटनेत्या तथा नगरसेविका सुनिताताई कुसनाके,नगरसेवक बंडू आलाम,नगरसेविका जास्वंदा गोंगले,नगरसेवक संतोष चौधरी,रेखा कूडमेथे,प्रा.रामटेके,नितेश झाडे,कमलेश निमगडे,निहार मेश्राम,भाऊजी रापंजी,सह आविस पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.