देशाचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी कार्यकर्ते बैठक संपन्न
खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन
गडचिरोली(Gadchiroli)-भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा गडचिरोली शासकीय विश्रामगृह येथे मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रम घेण्यासाठी व कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. मा. मोदी जी अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. असे प्रतिपादन या प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा यांनी याप्रसंगी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्याचे ठरविले.
या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,मान.आम.डॉ. देवरावजी होळी,आम.मा.कृष्णाजी गजबे,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्रदेश सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,जिल्हा संघटक प्रभारी अनिलजी डोंगरे,प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेवजी फाये,पंकजभाऊ खरवडे ता.अध्यक्ष युवा मोर्चा आरमोरी,पवनजी नारनवरे नगराध्यक्ष आरमोरी,अनिल कुनघाडकर,मुक्तेश्वर काटवे,विवेक बैस,अनिल तिडके,मधुकर भांडेकर,आशिष कोडाप,प्रिती शंभरकर,सारंग साळवे,उल्हास देशमुख,प्रशांत हटवार,शोयब पठाण,
तसेच अनेक युवा वर्ग कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.