भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोली भव्य मोफत रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिर

100

राष्ट्रनेता जन्मदिवस ते राष्ट्रपिता जयंती सेवा पंधरवडा

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोली भव्य मोफत रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिर

 

भव्य मोफत रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न

 

 

दिनांक: 27 सप्टेंबर 2022

देसाईगंज/कोंढाळा,(Gadchiroli)

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा गडचिरोली व ऑरिस हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज् मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत समाज मंदिर, कोंढाळा येथे भव्य मोफत रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गजबे यांनी मोफत रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. निश्चितच या शिबिरामुळे गरजू गरीब लोकांना लाभ मिळेल व त्यांची सेवा करण्याची संधी व पुण्याई आपल्याला प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार कृष्णा कसबे यांनी केले.

या शिबिराकरीता प्रचंड प्रतिसाद मिळाला ,तज्ञ डॉक्टरांद्वारे उपस्थित रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरात एकूण 519 रुग्णांची नोंदनी करण्यात आली .वाजवी दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले,याशिबीरात बरेच बिपी व शुकरच्या रूग्नांचा शोध लागला, हृदयविकाराचेही रूग्नांचे निदान झाले.या शिबीराकरीता कुरूड-कोकडी जिल्हापरीषद क्षेत्रातील बरेचगावचे नागरीक उपस्थित होते.लोकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी श्री किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गडचिरोली, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, रवीजी चव्हाण संघटन मंत्री पूर्व विदर्भ ओबीसी, सुनील पारधी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, रोशनी ते पारधी मा. सभापती महिला व बालकल्याण जि प गडचिरोली, बबलूभाई हुसेनी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी गडचिरोली, राजूभाऊ जेठाणी तालुकाध्यक्ष देसाईगंज, वसंता दोंनाडकर महामंत्री, योगेश नाकतोडे महामंत्री, नरेश विठ्ठलानी, अपर्णाताई राऊत सरपंच कोंढाळा, चक्रधर नाकाडे सरपंच तुळशी, केवळराम टिकले सरपंच कोकडी, गजानन सेलोटे उपसरपंच कोंढाळा, सुरेश तोंडफोडे उपसरपंच कोकडी, किरण कुंभलवार पो.पा., पंढरीजी नखाते ज्येष्ठ नागरीक, भास्कर पत्रे, मंगला शेंडे मा सरपंच, प्रमोदजी झिल्पे ग्रा पं सदस्य शीवराजपुर, डॉ. गायकवाड ऑरिस हॉस्पिटल नागपूर, लालाजी रामटेके, अशोक कांबळी, यादव कावळे व व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here