*भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट
गडचिरोली :- दि. 2 मे
*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस काल दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे तसेच माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मंत्री महोदयांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप समर्पित उमेदवार मोठ्या संख्येने निवडुन आल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व आगामी जिप, पंस व नगर परिषद निवडणूका संदर्भात आढावा घेऊन तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत स्नेह भोजनाचा आंनद घेतला.*
*यावेळी प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभाचे आम डॉ देवरावजी होळी, आरमोरी विधानसभा चे आम. कृष्णाजी गजबे, चिमूर विधानसभा चे आम. किर्तीकुमार भांगडिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश सदस्य बाबुरावजी कोहळे, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, पंस चे माजी उपसभापती विलास दशमुखे, मार्कंडा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन भांडेकर, चामोर्शी चे तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, वडसाचे तालुका अध्यक्ष राजू जेठानी , शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देवोजवार, दलित आघाडी चे शहर अध्यक्ष प्रा उराडे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस,विलास नैताम, देवाजी लाटकर, भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, महिला ओबीसी मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव नीताताई बैस, पुनम हेमके तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.*