प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना आपल्या देशात मत्स्यपालन व्यवसाय हा झपाटयाने वाढत असुन प्रगती पथावर आहे,खासदार अशोकजी नेतेमत्स्यव्यवसाय विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

137

प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना आपल्या देशात मत्स्यपालन व्यवसाय हा झपाटयाने वाढत असुन प्रगती पथावर आहे,खासदार अशोकजी नेतेमत्स्यव्यवसाय विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

मत्स्यमहोत्सव व कार्यशाळा

Savali (chandrapur)सावली :-पेंढरी (मक्ता) ता.सावली जि.चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना सध्या केंद्र सरकारद्वारे मच्छीपालन या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी योजना आहे. या योजनेला अधिक विकसित आणि प्रगत बनवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशात मत्स्यपालन या क्षेत्राला अधिक विकसित करणे आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून ६,७७,४६२ परिवारांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. जमीन आणि पाण्याचा विस्तार तीव्रता विविधीकरण आणि उत्पादक वाटप करून मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याचं काम राज्य व केंद्र सरकार करत आहे.तसेच मत्स्यपालन आणि मत्स्य पालकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व रोजगार वाढवण्याचे काम सुद्धा सरकारद्वारे केले जात आहे.

आज सावली तालुक्यात पेंढरी (मक्ता) येथे अतिशय चांगला कार्यक्रम मान.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संपन्न होत असून आपल्या लोकसभा क्षेत्रात होत असल्याने हा कार्यक्रम स्तुतीमय, कौतुकास्पद, वाखन्याजोगे कार्यक्रम घेतला त्यासाठी सुधीरभाऊ चे आभार मानावे तेवढे कमी आहे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले

याप्रसंगी सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक,मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर /गोंदिया, अशोकजी नेते खासदार गडचिरोली/चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा,

मा.श्री.विजय वडेट्टीवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,मा.श्री.विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपुर, मा.श्री.रविंद्र वायडा सहआयुक्त मत्स्यव्यवसाय,विजय शिखरे प्रादेशिक उपआयुक्त,चंद्रलालजी मेश्राम सेवानिवृत्त न्यायाधीश,विनोद गड्डमवार आयोजक,डॉ.दिलिप शिवरकर भोई समाजाचे संघटनेचे जेष्ठ नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन एस.टी मोर्चा, तसेच अधिकारी वर्ग, पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक बंधुभगिनीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here