पोलिस हाउसिंग सोसायटी मार्फत होणाऱ्या घरांची कामे तातडीने पूर्ण करा,आमदार डॉ देवरावजी होळी
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पीडिताना शासकीय सेवेत सामावून घेण्याची आवश्यकता
पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन केली जिल्हयातील विवीध समस्यांवर चर्चा
Gadchiroli :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पीडित लोक अतीशय प्रतिकूल परिस्थितीत जिवन व्यतीत करीत असुन त्यांना योग्य ते संरक्षण देवुन जिल्ह्यातील शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात उचित कार्यवाही करावी तसेच पोलिस हाउसिंग सोसायटी मार्फत होणाऱ्या नवीन घरांची कामे तातडीने पूर्ण करावी व आवश्यकता असल्यास शासनाकडे माझ्यामार्फत पाठपुरावा करावा अशी सूचना आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्याकडे झालेल्या चर्चेदरम्यान केली.
यावेळी आमदार महोदयांशी झालेल्या चर्चेदरम्यान आतापर्यंत नक्षल पीडित ८५ पैकी १५ लोकांना शासकिय सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती मा. पोलिस अधीक्षक यांनी दिली
चर्चेदरम्यान नक्षल शरणागत लोकांना घरकूल योजनेचा लाभ, अति दुर्गम भागामध्ये पोलीस यंत्रणेला बीएसएनएल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी दूर करणे, दुर्गम भागांतील रस्ते, इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावरही चर्चा करण्यात आली.