गडचिरोली(Gadchiroli):-स्पंदन फौंडेशनतर्फे संडे फॉर सोसायटी या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरातील नीट, जेईई, एमएचटी-सीईटी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव शहरातील मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व डॉ.कलाम यांचे अग्नीपंख हे पुस्तक देऊन करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांशी सवांद साधला.यावेळी सत्कार करणारे मान्यवर वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवर होते.त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना व नंतर कर्तव्य पार पाडताना आलेले आपले अनुभव कथन केले. यावेळी विद्यार्थ्यांना शहरातच राहून कसे यश संपादन केले हे सांगितले.पालकांनी पण आपले अनुभव सांगितले.यावेळी प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटचे समन्वयक इंजि. डॉ.सुरेश लडके, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत चलाख, सिटी पॅथचे डॉ.पंकज सकिनालवार, होमिओपॅथी तज्ञ डॉ.किशोर वैद्य, दंतरोग तज्ञ डॉ धम्मदीप बोदेले, मूळव्याध तज्ञ डॉ.सौरभ नागुलवार व स्पंदन फौंडेशनचे डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.चेतन गोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा.सुशांत वाटघुरे,राजू फुकटे,आकाश कांकलवार यांनी सहकार्य केले.