नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचन 

93

नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचन

Reconstitution of Drama Review Committee

Mumbai   मुंबई, दि. 1 : नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजने अंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून 23 अशासकीय सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.   या समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपावित, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रो. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरुप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गिते हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

 

नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या संचालकांना नाटकांचे परीक्षण करण्याचे अधिकार नसतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल. नाट्य परीक्षण समितीमधील सदस्य अनुदानासाठी अर्ज केलेल्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ, संगीत किंवा अन्य बाबींशी संबंधित असल्यास त्या सदस्यास संबंधित नाटकाचे परीक्षण करता येणार नाही. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी 23 सदस्यांपैकी किमान 11 सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक राहील.  ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here