नागपूर आज आदिवासी मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित रहा,आमदार डॉक्टर देवराव होळी
दिनांक २७ सप्टेंबर रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे दुपारी १२ मेळाव्याचे आयोजन
दिनांक २६ सप्टेंबर गडचिरोली
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी प्रदेशाच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे दुपारी १२ वाजता आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या आदिवासी मेळाव्याला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली असून या मेळाव्याला आदिवासी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे प्रभारी भुपेंद्रजी यादव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री फग्गणसिंह जी कुलस्ते यांचे सह वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.