धानोरा येथे ३० खाटांच्या वाढीव रुग्णालयास ८ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे मानले आभार

127

अखेर धानोरा येथे ३० वाढीव खाटांचे रुग्णालय मंजूर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

 

३० खाटांच्या वाढीव रुग्णालयास ८ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे मानले आभार

आता ५० खाटांच्या रुग्णालयात धानोरा तालुक्यातील नागरिकांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ

Dhanora(Gadchiroli) :-गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अखेर धानोरा येथे ३० खाटांच्या वाढीव रुग्णालयास मंजुरी मिळाल्याने आता या ठिकाणी ५० बेडचे मोठे रुग्णालय होणार आहे. त्याचा लाभ धानोरा तालुक्यातील रुग्णांना मिळणार असून त्यासाठी शासनाने ८ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.धानोरा तालुक्यातील नागरिकांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका हा अति दुर्गम नक्षलग्रस्त भाग असून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या मुबलक सुविधा नाहीत. पुढील उपचारासाठी रुग्णांना गडचिरोली येथे दाखल करावे लागते. त्यामुळे आता वाढीव ३० खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्याने या ठिकाणी धानोरा तालुक्यातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.रुग्णालयास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here