धानोरा बांधकाम विभाग(जिप) येथील कनिष्ठ अभीयंता अडकला एसीबीच्या जाळ्यात !1 लाख 70 हजाराची केली होती लाचेची मागणी

762

अभियंता अक्षय मनोहर अगळे (२०) यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

S bharat news network गडचिरोली :- तक्रारदार हा कंत्राटदार असून, त्याने बोधनखेडा पोचमार्ग तुमडीकसा-हिरंगे, रेंगेगाव- गोटाटोला, मुरुमगाव-रिडवाही येथील रस्त्यांची सुधारणा करुन एमबी मागितली. परंतु त्याकरिता कनिष्ठ अभियंता अक्षय अगळे याने संबंधित कंत्राटदारास १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अगळे याने पंचासमक्ष लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अक्षय अगळे याच्यावर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.

एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार राजेश पद्मगिरवार, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here