देसाईगंज पोलीसांनी अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन केले जप्त 18 गोवंशीय जनावरांसह एकुण 17,90,000/- रुपयांचा माल केला जप्त.
गडचिरोली जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. 12 यु.ए. 0789 यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता, वाहनामध्ये तेलंगना येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेली एकुण 18 गोवंशीय जनावरे मिळून आली. त्यामुळे इसम नामे 1) मोहम्मद जाकीर मो. इब्रााहीम रा. चंगेमुल, 2) गंजय अरुण किस्टया रा. मेडीपल्ली दोघेही राज्य (तेलंगना), 3) नरेश नागदेव पारधी, 4) रविंद्र दयाराम कुथे दोघेही रा. गांधीनगर तह. देसाईगंज जि. गडचिरोली यांचे ताब्यातील ट्रक क्र. टी.एस. 12 यु.ए. 0789 किंमत अंदाजे रु. 16,00,000/- व 18 गोवंशीय जनावरे किंमत अंदाजे 1,90,000/- रुपये असा एकुण 17,90,000/- रुपये किंमतीचा माल जप्त करुन त्यांचे विरुद्ध पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास परि. पोउपनि. प्रविण बुंदे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. साहिल झरकर सा. यांचे मार्गदर्शनात व देसाईगंज येथील पोनि. श्री. किरण रासकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.