दि जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्कूल बॅग्स व चादर,स्वेटर्स चे वाटप
देचलीपेठा Dechalipetha -Gadchiroli दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी दि जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. संगिता मेडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोश स्कूल ऑफ एक्सेलेन्स, देचलीपेठा तेथे ४२ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स वाटप करण्यात आले. तसेच देचलीपेठा परिसरातील अती गरजू लोकांना चादर व ६ महिन्या खालील बालकांना स्वेटर्स देण्यांत आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ संगिता मेडी Dr.sangita medi होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक पावे , दि फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य व मुंबई स्थित राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड येथे कार्यरत अभियंता मधुकर कांबळे,ग्राम पंचायत देचालीपेठा सदस्य मुकुंद तेलम व संजय जुयाला उपस्थीत उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव व दि जोश स्कूल ऑफ एक्सेलेन्स चे सर्वेसर्वा संतोष कांबळे यांनी केले देचलीपेठा हा भाग अती दुर्गम भागात मोडत असून येथील रहिवाशी अनेख सोयी सुविधा अलिप्त आहेत. येथिल लोकांच्या समस्या ओळखून दी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट जीमलगट्टा च्या वतीने प्री प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल चालवण्यात येत आहे. या शाळेत सध्या १०० मुले शिक्षण घेत असून अनेक मुले हे अत्यंत गरीब आहेत. हे ओळखून संस्थेच्या वतीने ४२ मुलांना स्कूल बॅग्स वाटप करण्यात आले. यासाठी ऑईल अँड नॅचरल गॅस ऑर्गनायझेशन येठी अभियंता रोशन पौनिकर यांचे मोलाचे आर्थिक साहाय्य मिळाले. तसेच चादर व स्वेटर्स साठी अमोल मुळे यांनी साहाय्य केले.