तेली समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा नावलौकिक करावा – तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन
उपरी येथे तालुकास्तरीय तेली समाज एकता महासंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संत जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
उपरी -सावली-चंद्रपुर :- दि. 12 मार्च
आपल्या संपूर्ण विदर्भात तेली समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे मात्र आपल्या समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यासाठी संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले. तेली समाज एकता महासंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
संताजी सोशल फाउंडेशन सावली च्या वतीने आयोजित तालुकास्तरीय तेली समाज एकता महासंमेलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व श्री संतश्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची स्थापना कार्यक्रमाचे आयोजन मौजा उपरी ता. सावली येथे दि 9 ते 11 मार्च रोजी करण्यात आले होते. काल दि 11 मार्च या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवरावजी भांडेकर होते. तर उदघाटन विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त ऍड धनराजजी वंजारी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, ओबीसी समाजाचे नेते बाबुरावजी कोहळे, विदर्भ तेली संघाचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खणके, सामाजिक कार्यकर्ते योगेश समरीत, गडचिरोलीचे विकास अधिकारी स्वप्नील सावरकर, ब्रम्हपुरीचे डॉ कावळे , मनोहरजी कुकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे उपसभापती दिवाकर भांडेकर, माजी जिप सदस्य भालचंद्र बोधलकर, माजी जिप सदस्या वैशाली कुकडे, उपरीच्या सरपंच कुमुदताई सातपुते, माजी पंस सदस्य गणपतराव कोठारे, उर्मिला तरारे, विदर्भ तेली संघाचे सावलीचे अध्यक्ष कुणघाडकर सर, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सदस्य खुशाल बोधलकर उपस्थित होते.
यावेळी 10 वी, 12 वि व उच्च शिक्षणात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सावली तालुक्यातील उपरी, भांसी, कापसी, पेटगाव सामदा, सोनापूर वाघोली केरोडा, कढोली गावातील शेकडो समाज बांधव, महिला उपस्थित होत्या.