तिरंगा रॅलीने दुमदुमला गडचिरोली  जिल्हा

80

तिरंगा रॅलीने दुमदुमला गडचिरोली  जिल्हा

 

Gadchiroli गडचिरोली दिनांक ९: हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आज ठिक-ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे नारे देवून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.तिरंगा रॅली कार्यक्रमाचे शहरी भागातील समन्वयन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी तर ग्रामीण भागातील कार्यक्रमाचे समन्वय जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे यांनी केले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत आहे . यावर्षी देखील राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची आवाहन जिल्हाधिकारी संजय दैनै व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here