आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा..
दिनांक :- ०६/१२/२०२४
गडचिरोली. :- आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांन तर्फे पूजनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आदरांजली करण्यात आले.
त्याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते तथा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, शहर महामंत्री विवेक बैस, देवाजी लाटकर, प्रा.उराडे सर, दीपक जाधव, लोमेश कोलते, गणेश नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.