जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष एडवोकेट कविता मोहरकर मॅडम यांची घटनास्थळाला व पीडित बालकांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

100

देसाईगंज येथील आमगाव गावामध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना (जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष एडवोकेट कविता मोहरकर मॅडम यांची घटनास्थळाला व पीडित बालकांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट)

दिनांक 08  जुलै 2024 s bharat news network  रोजी ग्रामवासियांनी दिलेल्या माहितीनुसार वडसा जवळील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव या गावात एका अल्पवयीन तरुणाने लहान-चार बालकांना शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली.

 

सदर घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर यांनी तात्परता दाखवून सदर घटनास्थळाला भेट दिली व सत्य परिस्थिती जाणून घेतली, आमगाव गावातील तलावाजवळ एका पॅथॉलॉजिस्टचे घराचे बांधकाम सुरू होते आजूबाजूला सामान पडलेले होते गावातील लहान मुले सदर ठिकाणी गेले असता कबूतर चोरल्याच्या आरोपामुळे पॅथॉलॉजिस्टच्या अल्पवयीन मुलाने सदर लहान मुलांस अमाणुश पद्धतीने मारहाण केली सदर घटना ही २१ जुलै ची असून खूप उशिरा उघडकीस झाली त्यामुळे संताप व्यक्त करून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यायचे आश्वासन अॅड. कविता

 

मोहरकर यांनी दिले. पीडित मुले अजूनही मानसिक दडपणात असून त्यांना समुपदेशनाचे अत्यंत गरज आहे तसेच पीडित बालकांपैकी काही बालकांच्या डोक्याला, पायाला व छातीला 15 दिवसानंतरही वेदना असल्यामुळे त्यांना तात्काळ सुयोग्य वैद्यकीय सेवा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच पिढीतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी न्याय देण्याची हमी अॅड. कविता मोहरकर यांच्या वतीने देण्यात आली सदर भेटीच्या वेळेस मनोज आतला, शर्वरी यामावर, विक्रांत भरटकर, उज्वला यामावार आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here