जिला निर्मीतीचे शिल्पकार Former late minister Baburao madavi माजी राज्यमंत्री स्व बाबुराव मडावी कोनशिलेचे उद्धाटन
स्व: मडावी अमर रहे’ च्या घोषणांनी निनादला चौक
Gadchiroli गडचिरोली – कै. बाबुराव मडावी स्मारक समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन, आदिवासी हलबा- हलबी समाज संघटना तथा महासंघ, नारी शक्ती संघटना, आदिवासी गोंड-गोवारी (कोपा) संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, आदिवासी एकता युवा समिती जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार २७ नोव्हेंबर रोजी धानोरा मार्गावरील नगरपरीषद जवळील स्व. बाबुरावजी मडावी चौकात स्व बाबुरावजी मडावी कोनशिलेचे उद्धाटन थाटात करण्यात आले.
काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्याहस्ते फित कापुन कोनशिलेचे उद्धाटन करण्यात आले.यावेळी वैâ.बाबुरावजी मडावी स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी, सचिव अमरसिंग गेडाम यांनी जिल्हा निर्मितीचे शिल्पकार बाबुरावजी मडावी यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित आदिवासी समाजबांधवांनी ‘ बाबुरावजी मडावी अमर रहे’ च्या दिलेल्या घोषणांनी बाबुरावजी मडावी चौक निनादून गेला होता.
या कार्यक्रमास माधवराव गावळ, गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, समितीचे अध्यक्ष गुलाबराव मडावी, अमरसिंग गेडाम, सदानंद ताराम, वैâलाश मडावी, देवराव अलाम, डॉ. चांदेकर, माजी सभापती रंजिता कोडापे, विनायक कोडाप, नगरसेविका रंजना गेडाम, संध्या उईके, हर्षल मडावी, वंदना मडावी, भारती मडावी, आरती कोल्हे, अन्नपुर्णा मेश्राम, शालीनी पोटावी,सोनम मडावी,वसंतराव कुलसंगे, नरेश कोडापे, बाळकृष्ण मडावी, वनिश्याम येरमे, जगदिश मडावी, नितेश मडावी,सरादु चिराम, देवराव कोवे, नामदेव उसेंडी,सुरेश किरंगे, महेश दुग्गा,डॉ.वसंतराव पोरेटी, मुकेश पदा, केशव उसेंडी, विठ्ठलराव कोडापे,डंबाजी पेंदाम, संजय शेडमाके, विजय मडावी, भूषण जुमनाके, मुकेश गेडाम,पुंडलिक पेंदाम, रविंद्र गेडाम,प्रशांत मडावी,अनिल आत्राम, साईबाबा आत्राम, किरण आत्राम,भाग्यश्री मडावी, तुशार कृष्णाके, मुकेश गेडाम, सुरज मडावी,होळी, विरा मडावी,प्रदीप कुलसंगे, हेमाताई कुलसंगे,सुरेश गेडाम,ईश्वरदास कोल्हे, गिता कोडापे, निशा कोडापे, आशिष कोडापे, नागोराव उईके, रोहीत अलाम ,मनिषा मडावी, विकास कुमरे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कै. बाबुरावजी मडावी स्मारक समिती, गडचिरोली व समस्त आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.