चामोर्शी मुल मार्गावर भव्य रास्ता रोको जनआंदोलन तालुका प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको व जनआंदोलन मागे

43

चामोशी मुल मार्गावर भव्य रास्ता रोको जनआंदोलन तालुका प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको व जनआंदोलन मागे!

आंदोलनकर्ते यांनी रस्त्यावर रोवली बेशरमची झाडे!!आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ केली कामास सुरुवात!

चामोर्शी (गडचिरोली) chamorshi  – gadchiroli 9 ऑगस्ट 2024 चामोर्शी भेंडाळा हरणघाट मूलमार्गाचा काही भागातील काम झालेला आहे परंतु काही काम पूर्ण न झाल्यामुळे अनेक ठिकाणी जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले आहेत या खड्ड्या मुळे या रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिकांना खूप अडचनीचा सामना करावा लागत होता अनेक नागरिकांचे वाहने खराब होत आहेत अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर दररोज घडत आहेत या रस्त्याबाबत बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वारंवार सांगून न झाल्याने शेवटी आज चामोर्शी येथील डांबर प्लांट समोर चामोर्शी मूल मार्गावर चामोर्शी चाकलपेठ फाट्यासमोर भव्य रास्ता रोको जन आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक आशिष भाऊ पिपरे व राष्ट्रीय लोकहित सेवा जिल्हा अध्यक्ष -रमेश अधिकारी , काळी पिवळी चालक-मालक संघटनेचे अमर भाऊ पठाण यांच्या नेतृत्वात काढण्यात आला यावेळी तालुका प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले पोलीस निरीक्षक पुल्लुरवार साहेब यांच्या मध्यस्थीनंतर तालुका प्रशासनाचे तहसीलदार घारुडे साहेब व नायब तहसीलदार वैद्य साहेब व तालुका उपविभाग अभियंता बड्डे साहेब उप अभियंता लील्हारे साहेब यांनी रास्ता रोको आंदोलनास भेट देऊन निवेदन स्वीकारला व आश्वासन दिला या रस्त्याच्या दुरुस्तीचा काम उद्यापासून तात्काळ सुरू करण्यात येईल सदर आश्वासन दिल्या नंतर सदर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने, शहरातील स्वाभिमान संघटनेचे यशवंत त्रिकांडे ,दिवाकर कोहळे ,राजू धोडरे, युवा नेते शुभम भांडेकर ,चाकलपेठ येथील सरपंच सुनील भाऊ रामगोनवार , युवासंकल्प संस्थेचे अध्यक्ष युवा नेते सुरज नैताम , ट्रॅव्हल्स असोसिएशनचे मास्टर उत्तम स्वर्णकार ,राणा वैद्य

काळी पिवळी चालक-मालक असोसिएशन चामोर्शी

चेतन वडेट्टीवर, मंगेश सदुलवार, फिरोज खान, रक्षित खंडाळे , राहुल सदूलवार ,गोपाल घागरतवार , दिलीप राय ,मंगेश सदुलवार, नितीन चन्नावार ,

पिंकू खंडाळे ,प्रवीण चन्नावार प्रेमचंद गेडाम, व गावातील पदाधिकारी युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here