गोवा राज्याच्या अनु.जनजाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी समिती बैठक MP Ashok nete. खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
GOA गोवा राज्याच्या अनु.जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी समिती ची बैठक पणजी येथे मा.खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात संपन्न झाली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक धोरण, संघटन मजबूत करणे, अनु.जनजाती मोर्चाची व्याप्ती वाढविणे इत्यादी विषयांवर खासदार तथा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी गोवा प्रदेश मोर्चा चे अध्यक्ष सदानंद जी तनावडे,गोवा विधानसभा अध्यक्ष (सभापती) रमेशजी तावडकर,प्रदेश अध्यक्ष एस.टी मोर्चाचे प्रभाकर गावकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.