गोंडवाना विद्यापीठाला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिप मध्ये तीन रजत तर एक कास्य पदक

105

गोंडवाना विद्यापीठाला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिप मध्ये तीन रजत तर एक कास्य पदक

Gondwana University won three silver and one bronze medal in All India University Karate Championship

santoshbharatnews gadchiroli gondwana university gadchiroli गडचिरोली(गो वि )दि :१ अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ बिलासपूर छत्तीसगढ येथे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात भारतातील २४० विद्यापीठातील जवळपास ३००० च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .त्यात गोंडवना विद्यापीठातील कराटे खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा काता कुमिते या प्रकारात घेण्यात आली. गोंडवाना विद्यापीठातून टीम काता या प्रकारात शुभम येनगटीवार, क्षितिज विगम, चेतन लोहोकरे या विद्यार्थ्यांनी भारतातून ७० टीम मधून रजत पदक जिंकले. त्याचप्रमाणे अंकुश मूल्यवार या विद्यार्थ्यांने कुमीते वजन गट -६०किलो मध्ये कास्यपदक पटविले आहे. भारतात कराटे या खेळामध्ये सर्वोच्च असणारी ही स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेमध्ये पदक जिंकणे ही खूप मोठी बाब आहे. या स्पर्धे करिता गोंडवाना विद्यापीठच्या कराटे विद्यार्थ्यांनी प्रंचड मेहनत व परिश्रम ,सराव घेतलेला आहे .मार्गदर्शक योगेश चव्हाण, विनय बोदे, मिलिंद गेडाम ,मुहाफिझ सिद्दिकी यांनी विद्यार्थ्यांकडून परिश्रम करून घेतले. या चारही खेळाडू विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया गेम करीता निवड झालेली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here