गोंडवाना विद्यापीठात पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप ची संधी
गडचिरोली (गोवि)दि:७
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास ‘पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप’ची संधी गोंडवाना विद्यापीठात उपलब्ध होत आहे. त्यामुळे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे .
या सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन.
आणि मानव विज्ञान विद्या शाखा
इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.
*अशी मिळवता येईल फेलोशिप*
फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली असून, पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १०मे पर्यत अर्ज करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे अशी माहिती नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांनी दिली आहे.
*फेलोशिपची ठळक वैशिष्ट्ये*
पोस्ट-डॉक्टरेट संशोधन हे शैक्षणिक/संशोधन सुरू करण्यासाठी तसेच तरुण संशोधकांना तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे सक्षम पाऊल आहे.
पोस्ट डॉक्टरल कार्यकाळ नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची,
एखादे क्षितिज विस्तृत करण्याची संधी देखील प्रदान करते .
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पीएच. डी. धारकांना विद्यापीठ पोस्टडॉक्टरल फेलोशिप चा लाभ घेता येईल.
पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपमध्ये २४००० रुपये दरमहा फेलोशिप असेल
दरवर्षी देण्यात येणाऱ्या पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची एकूण संख्या चार असेल
पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप विद्यापीठाच्या चार विद्याशाखांमधून जसे, की विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव विज्ञान विद्या शाखा आणि आंतरविद्याशाखा राहील.
पीएच.डी नंतर संशोधन क्षेत्रात सखोल काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळू शकेल. परिणामी संशोधन व अध्यापन क्षेत्रात पुढे जाऊन भरीव काम होईल.
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात असणाऱ्या संशोधक विद्यार्थी ‘गोंडवाना विद्यापीठ पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप ‘(गो वि – पीडीएफ) प्रोग्राम’ या अभ्यासक्रमासाठी पात्र धरण्यात येईल.
विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविज्ञान विद्या शाखा, आंतर विद्या शाखा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनाची संधी याद्वारा उपलब्ध होणार आहे.
‘गोवि-पीडीएफ प्रोग्राम’ हा पूर्ण वेळ असून या काळात कुठेही व कोणत्याही स्वरूपात नोकरी, संशोधन किंवा इतर शिष्यवृत्ती करण्याची परवानगी नाही.
अधिक माहिती साठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील परिपत्रकाचे अवलोकन करावे.