गोंडवाना विद्यापीठाचा अभिनव उपक्रम विद्यापीठ आपल्या दारी

131

गोंडवाना विद्यापीठाचा अभिनव उपक्रम विद्यापीठ आपल्या दारी

Gondwana University’s innovative initiative University at your doorstep

ग्रामीण भागातील लोकांना मिळेल अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी तसेच कौशल्यावर आधारीत रोजगार युक्त शिक्षण

 

santoshbharatnews gadchiroli -gondwana university गडचिरोली(गो वि)दि:६ सकाळी नऊ ते सात या वेळेत गावातील लोकांचा दैनंदिन रोजगार असतो मग विद्यापीठाने असं ठरवलं की ज्यांचे अर्ध्यातून शिक्षण सुटलेले आहे किंवा ज्यांनी कधी शिक्षणच घेतलेले नाही. अशा लोकांसाठी विद्यापीठ आपल्या दारी हा उपक्रम सुरु करायचा.

विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी विविध कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करून रोजगार विषयक शिक्षण देणे. असा विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे.

 

नुकतीच जांभळी या गावी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे व दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बालसेकर यांनी भेट देऊन शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, विद्यापीठाने ३० लोकांची नोंदणी करून घेतलेली आहे. त्याची वर्गवारी करू आणि तुम्हा लोकांना शिकण्याची संधी देऊ.यासाठी रोजगार पाडायची गरज नाही. विद्यापीठाचे प्राध्यापक तुमच्या पर्यंत येतील. येत्या पंधरा ते वीस दिवसात हा उपक्रम सुरू होईल.

 

दर्शनिका विभागाचे सचिव दिलिप बालसेकर म्हणाले, शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांची क्षमता ही जास्त आहे.

विद्यापीठाकडून सुरू असलेल्या उपक्रमात सर्वांनी सहकार्य करावे आणि शिक्षित होऊन आपल्या गावाचे नाव देशाच्या नकाशावर झळकलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवे.

 

यावेळी डॉ. नरेश मडावी, डॉ.माने यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. अपूर्ण शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी ते खूप उत्साही आहेत. गळतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसात वास्तविक वर्ग सुरू करू. अभ्यासक्रम ५०% पारंपारिक आणि ५०% जीवन कौशल्यावर आधारित असेल. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीसाठी हा आणखी एक मैलाचा टप्पा ठरेल अशी आशा

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केली आहे.

 

*विद्यापीठ आपल्या दारी उपक्रम*

रोजगार आणि कौशल्य विषयक जीवन शिक्षण देऊन, ज्या विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करणे. या उपक्रमामुळे आपल दिवसभराच काम सांभाळून , त्यांना त्यांच्याच गावात शिकता येईल.

यामुळे ते स्वतः तर साक्षर होतीलच पण त्यांच्या मुलांनाही ते शिकवू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here