गृह करात केलेली अवाजवी करवाढ munclipal council Gadchiroli न. प. ने कमी करावी-विजय गोरडवार vijay gordwar यांची मागणी.

212

गृह करात केलेली अवाजवी करवाढ न. प. ने कमी करावी-विजय गोरडवार यांची मागणी.

 

Gadchiroli गडचिरोली शहरात नगरपरिषदे ने नुक्ताच लागू केलेला गृहकर हा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असुन, ही केलेली करवाढ मागील गृहकराच्या जवळ जवळ चारपट आहे. त्यामुळे नागरिकांना धक्काच बसण्या सारखा भाग आहे. या आधी गृहकरात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना गृहकर भरणे आवाक्याच्या बाहेर होणार असल्याने या बाबत नगर परिषद चे माजी सभपाती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांचे सह शिष्ठमंडळाने दिनांक २९/११/२०२२ रोजी न. प. मुख्याधिकारी, आणि जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा केली. शहरातील वाढविण्यात आलेला गृहकर, तथा अनियमित नाल्यांचा उपसा, शहरातील अनेक वॉर्डातील बंद विजदिवे, त्याच बरोबर शहरातील मुख्य रस्त्यावरील गुरांचा वावर ज्या मुळे अपघातांचा सतत चा धोका, आणि शहरातील प्रत्येक वॉर्डांत होणारा डुकरांचा त्रास याकडे न प ने विशेष लक्ष देण्याच्या संबंधाने सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले, तसेच वाढलेल्या गृहकराचे संबंधाने उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात नईम शेख, भास्कर निमजे, नागोराव उईके, अमर खंडारे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष, मल्लय्याजी कालवा, विजय जाधव, खेमदेव हस्ते आदी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here