गावात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा व विविध योजनांचा, कुटुंब आणि गावातील सर्व नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा.- संजय गावडे सरपंच ग्रामपंचायत कामनगड
धानोरा(gadchiroli)दि. 17/09/2022 :- मौजा कामनगड ग्राम पंचायत कामनगड येथील सभागृहात ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्ह्यात तालुका पासून तर, ग्रामीण भागांतील अति दुर्गम भागात विविध प्रकारच्या प्रकल्पातून योजना राबविली जात आहे. त्या सर्व गावात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा व विविध योजनांचा, कुटुंब आणि गावातील सर्व नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्याव. असे विविध प्रकारच्या माहिती देऊन त्याचं समजेल अशा गोंडी भाषेतून माहिती यावेळी संजय गावडे सरपंच ग्रामपंचायत कामनगड यांनी मार्गदर्शनातून सांगीतले.
यावेळी खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
समितीची आवश्यकता तसेच गरज, राष्ट्रिय आरोग्य अभियान 2005, राष्ट्रिय आरोग्य अभियानाची उद्देश तसेच या अभियानाचे ध्येय.
समितीची 4 स्तरिय यंत्रणा, समितीची रचना, समितीचा कार्यकाळ, समितीची अपेक्षित कामे, श्रमदान, समितीची अबंधित निधि, अबंधित निधिचे प्रमाण, अबंधित निधी कुठे खर्च करता येणार की, नाही.
अश्या विविध विषयांवर विरेंद्र चावर क्षेत्रिय समन्वयक कुपोषण मुक्त गाव अभियान प्रकल्प ता. धानोरा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच रमेश वालको, गाव पाटील रामजी गावडे, माजी उपसरपंच धनिरान गावडे, देवराव गावडे, सुखराम गावडे, सुखलाल गावडे, पांडुरंग बोगा, दिनेश नरोटे, ग्राम पंचायत सदस्य कविता गावडे, अस्मिता गावडे, केजुराम गावडे, संतोष नरोटे, आशा वर्कर जया गावडे, जाईताई नैताम, सिंधू पदा, सिताराम पदा, रमेश गावडे, शिक्षक व इतर समिति सदस्य व गावकरी उपस्थित होते.