गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार डॉक्टर देवरावज होळी
कुनघाडा माल व ठाकरी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
कुनघाडा माल येथील पोलीस भरतीत निवड झालेल्या युवकांचा सत्कार
दिनांक 6 सप्टेंबर गडचिरोली s bharat news network आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास सुरू असून या क्षेत्राच्या विकासासाठी आपण कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुनघाडा माल व ठाकरी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.
यावेळी कुणघाडा माल येथील पोलीस भरतीत निवड झालेल्या युवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे, धर्मप्रकाश कुकुडकर, कुणघाडा माल सरपंच मायाताई कन्नाके , उपसरपंच पौर्णिमा गोडगेलवार ,पोलीस पाटील मंदाताई तलांडे यांचे सह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.