गडचिरोली-वडसा रेल्वेचे संपूर्ण अधिग्रहण येत्या ३ महिन्यात पूर्ण होणार आमदार डॉ. देवरावजी होळी यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा
७६ टक्के जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण
Gadchiroli :-गडचिरोली वडसा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून अनेक वर्ष होत असून अजून पर्यंत रेल्वेचे काम प्रत्यक्षपणे सुरू न झाल्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. या रेल्वे मार्गाकरिता केंद्र व राज्य सरकारनेही निधी उपलब्ध करून दिल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेबजी दानवे यांच्याशी चर्चा करताना केली.यावेळी मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी ७६ टक्के जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ३ महिन्यांमध्ये उर्वरित २४ %जागेचे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.