गडचिरोली येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आदिवासी दिनानिमित्य आदिवासी सेवक प्रमोद पिपरे यांचा सत्कार
गडचिरोली :- दि. 9 आगस्ट
आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली च्या वतीने आज दि 9 आगस्ट रोजी गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिह, भाजपचे लोकसभा समन्वयक तथा आदिवासी सेवक प्रमोदजी पिपरे, जात पडताळणी विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी निलय राठोड, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात आश्रमशाळा मधील व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांच्या हस्ते आदिवासी सेवक प्रमोदजी पिपरे यांचा शाल श्रीफळ व झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी विविध आश्रमशाळे मधील मुलामुलींनी सुंदर असे गोंडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात आदिवासी विभागाचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.