पोलिसांच्या महा मॅरेथॉन मध्ये धावले आमदार डॉ देवराव जी होळी
गडचिरोली पोलिसांच्या वतीने महा मॅरेथॉन २०२३ या स्पर्धेचे आयोजन
मॅरेथॉन मधील विजेत्यांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
दिनांक ५/३/२०२३ गडचिरोली
जिला प्रतिनिधी
Gadchiroli(district police office) आदिवासी बांधवांसाठी धावूया, सगळ्यांना विकासाकडे नेऊया या हेतूने गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या वतीने महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी या स्पर्धेमध्ये धावून आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई श्री प्रवीणजी साळुंखे, पोलीस उप महानिरीक्षक मा. संदीपजी पाटील साहेब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पलजी यांचे सह पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस विभागाच्या या आयोजनाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विशेष कौतुक केले असून. अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करून पोलीस विभाग सर्वांमध्ये नव चैतन्याचे वातावरण निर्माण करीत असल्याचे त्यांनी म्हटले. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले. आमदार डॉक्टर देवरावजी होळी , आमदार कृष्णाजी गजबे व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.