गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान चा विकास करा लोकसभेत खासदार अशोकजी नेते ची मागणी

121

खासदार अशोकजी नेते यांनी शून्यकाल मध्ये सुरू असलेल्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड़, तसेच चिमूर तालुक्यातील रामदेगी अशा पावित्र्य या ठिकाणांचा केंद्रीय पर्यटनाच्या यादीत समावेश करून त्यांचा पर्यटन म्हणून विकास करून त्यांचे सुशोभीकरण करावे.याकरिता शून्यकालमध्ये दिल्ली येथे अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला

 

दिं.१४ फेब्रुवारी २०२३

 

दिल्ली:-मार्कडा़ देवस्थान हे महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत

तालुका चामोर्शी येथील एक फार मोठे धार्मिक स्थळ असून ते काशी या नावानेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या धार्मिक स्थळाला खूप महत्त्व आहे.जवळून जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर.पवित्र मार्कड़ (देव) मध्ये मार्कडेय ऋषींच्या तपश्चर्या ने पावन झालेले भगवान शिव शंकरजींचे एक मोठे मंदिर आहे. येथे केवळ महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर इतर भागातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे येणारे लोक धन्य होतात.भाविक भक्तांची ही संख्या सुमारे १५-२० लाख आहे. या धार्मिक स्थळाचे महत्त्व पुराणातही वर्णन केलेले आहे,परंतु भाविक भक्तासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा येथे मोठा अभाव आहे.

 

माझ्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड़ येथे आदिवासींचे आराध्य दैवत असलेल्या पारी कोपार लिंगो मा कली कंकाली महाकाली ची प्रमुख व प्राचीन लेणी व मंदिर आहे.यासाठी महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातून आदिवासी भाविक मोठ्या संख्येने येतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा इत्यादी तसेच आदिवासीबहुल भागातून आणि दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आदिवासी माता प्राचीन गुंफा आणि मंदिराला विशेष उत्सवानिमित्त भेट देतात. ही संख्या जवळपास ४०-५० हजारांवर पोहोचते.

तसेच लोकसभा मतदारसंघातील चिमूर तालुक्यातील रामदेगी येथे भगवान श्री रामाचे मंदिर असून पौष (जानेवारी) महिन्यात मोठी यात्रा असते आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने धार्मिक यात्रेसाठी येतात, परंतु वरील सर्व पवित्र व तीर्थक्षेत्रे येथे सार्वजनिक सुविधा व पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने भाविक भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

याकरिता खासदार अशोकजी नेते यांनी केंद्र सरकारला आदिवासीबहुल भागात असलेल्या वरील सर्व धार्मिक स्थळांचे पावित्र्य लक्षात घेऊन या सर्व ठिकाणांचा केंद्रीय पर्यटनाच्या यादीत समावेश करून त्यांचा पर्यटन म्हणून विकास करून त्यांचे सुशोभीकरण करावे. रस्त्यांची दुरुस्ती,मजबुतीकरण व कॉटिंग, शौचालये,धर्मशाळा बांधणे, आदिवासींच्या कलागुणांच्या विकासासाठी सांस्कृतिक भवन बांधणे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादीसाठी आवश्यक निधी वाटप करण्याची मान्यता मिळाल्यास सर्व पर्यटन स्थळे पर्यटन विकास व्यवसाय होतील,व या माध्यमातुन लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल.यासाठी खासदार अशोकजी नेते यांनी शून्यकाल मध्ये सुरू असलेल्या दिल्लीच्या अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड़, तसेच चिमूर तालुक्यातील रामदेगी अशा पावित्र्य या ठिकाणांचा केंद्रीय पर्यटनाच्या यादीत समावेश करून त्यांचा पर्यटन म्हणून विकास करून त्यांचे सुशोभीकरण करावे.याकरिता शून्यकालमध्ये दिल्ली येथे अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here