Gadchiroli गडचिरोली:-पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन गडचिरोली येथे 15 व 16 एप्रिल 2023 ला होणार आहे.भारतात प्रथमच होत असलेल्या या महिला साहित्य संमेलनाकडे साहित्याचे अभ्यासक, संशोधक व अनेक राज्याचे डोळे लागले आहेत.संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ स्ट्रीमलेट डाखर मेघालय आणि उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता मा नजुबाई गावित धुळे या आहेत.विशेष अतिथी संयुक्त राष्ट्र संघाचे इंडिजिनस पिपल्स माजीअध्यक्ष या.फुलमनजी चौधरी, संयुक्त राष्ट्र संघाचे भाषा विभाग प्रमुख मा.बेंजामिन बारा, जयपाल सिंग मुंडा पुस्तकाचे लेखक तथा माजी सनदी अधिकारी रुपचंद वर्मा नोएडा,ममता कुजुर छत्तिसगड, सुप्रसिद्ध संथाली कवयित्री निर्मला पुतुल, डॉ हिरा मीना राजस्थान,वाहरू सोनवणे,व विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक हजेरी लावणार आहेत.हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे