गडचिरोलीतील सुरजागढ खाणीतील मजुर व अंभीयत्याचा मृत्यु

253

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहखाण उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघेजण ठार झाले. ही घटना 06/08/2023  ला संध्याकाळी जवळपास सहा वाजुन तिस मीनींटाच्या दरम्यान घडली  वाजता.

सोनल रामगीवार Sonal ramgiriwar (वय २६, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरयाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरयाणातील hariyana मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीवार व अन्य दोघे ठार झाले. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहीती ऊपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here