कॅरी फॉरवर्ड लागू करा:- तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, विद्यार्थी संघाची मागणी

19

कॅरी फॉरवर्ड लागू करा:- तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, विद्यार्थी संघाची मागणी

कुलगुरूंना मागणी पत्र सादर

 

गडचिरोली :- महाराष्ट्रातील टोकात वसलेल्या गडचिरोली व चंद्रपूर दोन्ही जिल्हे अतिशय मागासलेल्या आणि अशिक्षित म्हणून ओळखला जातो नागरिक-विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाच्या वतीने गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली होती. उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सोय सुविधा राहत्या ठिकाणी भेटू लागल्या व तसेच गडचिरोली जिल्ह्यात नसलेल्या शिक्षणाचे अनेक फॅकल्टीची सुरुवात याठिकाणी झाली विशेष म्हणजे येथे शिक्षेचे प्रमाण फार कमी आणि तसेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे प्रमाण जास्त आहेत.अजूनही अनेक ठिकाणी शासन शिक्षणेची गंगा पहोचविण्याचे कामे करीत आहे आणि तसेच अनेकदा आपल्याला पहायला मिळते की विद्यार्थी वर्ग शिक्षणापासून वंचित राहतात आणि नको त्या मार्गावर निघतात.गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणात गोरगरिब जनतेची प्रमाण आहेत अश्याने शिक्षण घेत असतांना महाविद्यालयाची फी सुद्धा अनेक विद्यार्थी भरू शकत नाही आणि शिक्षणापासून वंचित होतात.यावर्षी गोंडवाना विद्यापीठात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रणाम कमी आहे आणि तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थीचे प्रमाण जास्त यामुळे कोणत्याही विद्यार्थीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि येत्याकाळी गडचिरोली व चंद्रपूर समस्त जनता शंभर टक्के शिक्षित व्हावी असे आपले निर्धार आणि ध्येय आहे म्हणून आपण आपल्या अधिकाराचे वापर करून कॅरी ऑन लागू करावे असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कॅरी फॉरवर्ड बाबत सूचना दिल्या आणि येत्या साथ दिवसात आपल्याला प्राप्त असलेल्या अधिकाराचे वापर करून विद्यार्थ्यांचे समस्या मार्गी लावण्याचे अश्वासन तनुश्री आत्राम आणि विद्यार्थी संघाला दिले

यावेळी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम,अनवाज कुरेशी,सलमान खान,मयूर कलवल,अभिजित लिहितकर आकाश बूटोलिया महेश गौरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here