एका जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

33

एका जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

. शासनाने जाहिर केले होते एकुण 06 लाख रूपयांचे बक्षिस.

गडचिरोली :+ शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 673 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय 42 वर्ष, रा. कोसमी नं. – 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम

 दलममधील कार्यकाळ

 

. सन 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत.

. 2007 ते 2012 टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजन मध्ये कार्यरत.

. 2012 ते 2020 पर्यंत प्लाटुन 15 (टिपागड एरिया) येथे कार्यरत.

. 2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत

टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत.

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 

 चकमक- 18

. सन-2004 मध्ये मौजा मानेवारा व मौजा बंदुर अशा दोन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

. सन -2014 मध्ये मौजा बोटेझरी जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता

. सन -2016 मध्ये मौजा दराची जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.

. सन-2019 मध्ये मौजा गांगीन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.

. सन-2020 मध्ये मौजा किसनेली जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.

. सन-2021 मध्ये मौजा कोडुर (माड एरीया) (छ. ग.)जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.

 जाळपोळ -02, खुन:-08, ईतर-06 एकुण-34

 

 

 

 

 आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

 

 गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

 दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.

 दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.

 वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

 वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

 गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

 

 

 महाराष्ट्र शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

 

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर ंिसंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here