एका जहाल महिला माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
. शासनाने जाहिर केले होते एकुण 06 लाख रूपयांचे बक्षिस.
S bharat news network. (Sp office )Gadchiroli गडचिरोली :- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 672 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता, वय 40 वर्ष, रा. तुर्रेमरका, पो. लाहेरी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल महिला माओवादी सदस्याबाबत माहिती
1) संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता
– दलममधील कार्यकाळ
. सन 2007 मध्ये नैबरेड दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये सदस्य पदावर भरती.
. सन 2008 मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये बदली होवुन 2010 पर्यंत कार्यरत
. सन 2010 मध्ये महासमुंद (छ.ग.) दलममध्ये बदली व त्यानंतर 2014 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होवुन आजपर्यंत कार्यरत
– कार्यकाळात केलेले गुन्हे
– चकमक – 07
. सन 2008 मध्ये मौजा आकीबेडा (छ.ग) जंगल परिसरात नारायणपुर पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2008 मध्ये मौजा बासिंग (छ.ग) जंगल परिसरात नारायणपुर पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2010 मध्ये मौजा पडकेपल्ली जि. महासमुंद (छ.ग.) जंगल परिसरात सीआरपीएफ सोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2012 मध्ये मौजा परदियापल्ली जि. महासमुंद (छ.ग.) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2015 मध्ये मौजा गंधमर्दान जि. बरगड (ओडिशा) जंगल परिसरात च्ग्र्क्र SOG (Special Operation Group) ओडिशा व बरगड पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2022 मध्ये मौजा गंधमर्दान जि. बरगड (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2024 मध्ये मौजा खंडीझरण जि. बरगड (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– जाळपोळ-01
– सन 2008 मध्ये मौजा कृष्णार-सोनपुर जि. नारायणपुर (छ.ग) रोडचे काम चालु असतांना ट्रॅक्टर व जेसीबीच्या जाळपोळीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– खून -03
. सन 2012 मध्ये मौजा भरतोंडा जि. बरगड (ओडिशा) गावातील सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2015 मध्ये मौजा जामशेठ जि. बरगड (ओडिशा) गावातील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन 2017 मध्ये मौजा सालेपल्ली जि. बरगड (ओडिशा) गावातील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
– नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
– दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
– वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
– दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
– खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
– चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
– शासनाने जाहिर केलेले बक्षिस.
– महाराष्ट्र शासनाने संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
– आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 24 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.