आरमोरीत मा. खा. अशोकजी नेते यांची प्रचार कार्यालयाला भेट – विजयासाठी ठोस संघटनात्मक नियोजनाची चर्चा
दि. १० नोव्हेंबर २०२४, आरमोरी: भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी आरमोरी येथील प्रचार कार्यालयास भेट देत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णाजी गजबे यांच्या विजयासाठी ठोस संघटनात्मक नियोजनावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीत गजबे यांना विजयी करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रभावी प्रचार योजनांवर मार्गदर्शन करत स्थानिक पातळीवर संघटनेची ताकद वाढवण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
यावेळी आरमोरी भाजपा तालुकाध्यक्ष पंकज जी खरवडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते.