आम आदमी पार्टी गडचीरोली शेतकरी संवाद यात्रा

92

आम आदमी पार्टी गडचीरोली शेतकरी संवाद यात्रा

गडचिरोली:- आम आदमी पार्टी गडचीरोली जिल्हा तसेच आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली. दिनांक १८/जुलै/२०२२ला आम आदमी पार्टी शेतकरी संघटनेची स्थापना करन्यात आली. ईतर शेतकरी संघटनेच्या धेय्य धोरनापेक्षा आगळी वेगळी आखणी करुन पुर्व विदर्भातून कार्याला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अकोला ,गोदींया मार्गे गडचीरोलीत दाखल झाले. बोदली मेंढा येथिल ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या गावाला भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट देवून सांत्वन करन्यात आले. तसेच लंपि आजाराने २० मेंढ्या मृत पावलेल्या शेळी पालक शेतकऱ्यांला भेट देन्यात आली. त्यांच्या समश्या जाणून घेण्यात आल्या तसेच या संमदाने शासकीय मदत मीळवून देण्याबाबत पाठपूरावा करन्याचे आस्वान देन्यात आले. अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मूळे शेतकऱ्यांचे होनारे नुकसान हे शासकीय मदतीपेक्षा कीतीतरी अधीक पटीने असून याची पूर्णपणे शासनाने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. पंतप्रधान पिक विमा ही योजना म्हणजे पाढरा हत्ती ठरत आहे असे सुतोवाच करन्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी केले तर संचालन आम आदमी पार्टी जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आम आदमी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिपिन पाटील नादुरबार,आपआटो रिक्षा चालक संघटना तसेच शेतकरी संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य पुणे, बाबासाहेब चव्हाण, वाशिम जिल्हा अध्यक्ष ॲड.मनिष मोडक,कैलास भदाने, महेंद्र खैरनार,डॉ.देवेंद्र मुनघाटे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय जीवतोडे,अलका गजबे, सोनल नन्नावरे,निलकंठ दाने,रुषी गेडाम, हितेंद्र गेडाम, नामदेव पोले,मेंढा ग्रामपंचायत सरपंच पल्लवी गावतूरे,उपसरपंच वैशाली चाचाने,आनंदराव दाने,अचीत ठाकूर, सुरेश दाने,महागू पिपरे बोदली,…… इत्यादी कार्यकर्ता हजर होते.राज्य अध्यक्ष यांचे वतिने सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. अलकाताई गजबे यांनी उपस्थितांचेआभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here