आदिवासी समाजाच्या डि-लिस्टिंग संदर्भात गडचिरोली विश्रामगृहात बैठक संपन्न
*जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने बैठकीचे आयोजन*
आम. डॉ. देवरावजी होळी, सुरक्षा मंचाचे,प्रकाश गेडाम,कल्याण आश्रमा चे मा.विश्वेश्वराव जी कोडाप यांची प्रमुख उपस्थिती
दिनांक २७/१०/२०२३ गडचिरोली
आदिवासी समाजातून इतर धर्मात गेलेल्या लोकांना आदिवासी समाजाचे लाभ देण्यात येऊ नये त्याकरिता आदिवासी समाजाचे डि-लिस्टिंग करणे आवश्यक असून त्याकरिता संपूर्ण आदिवासी समाजाने जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने आयोजित गडचिरोली येथील विश्रामगृहातील बुध्दिवंत आदिवासींच्या बैठकीच्या प्रसंगी केले.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जनजाती सुरक्षा मंचाचे , प्रकाशजी गेडाम,कल्याण आश्रमा चे प्रांत उपाध्यक्ष विश्वेश्वररावजी कोडापे, प्रांत मिडीया प्रमुख श्रीमंत सूरपाम, डॉ प्रमोद खंडाते, डॉ बागराज धुर्वे ,डॉ सुनील मडावी, डॉ सचिन मडावी, डॉ. माधुरीताई किलनाके,श्री गुलाबराव मडावी, दिवाकर हलामी, हर्षल गेडाम, विजय शेडमाके, देवा नैताम, डॉ मनोहर मडावी, लक्ष्मीताई कन्नाके जयश्रीताई येरमे, वर्षाताई शेडमाके , सुरक्षा मंचाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या आदिवासी समाजाने आपली मूळ संस्कृती, परंपरा, पारंपारिक आदिवासी देवपूजा पद्धती सोडू नये ख्रिश्चन, मुस्लिम धर्मात धर्मांतर करू नये अशा विविध चर्चा करण्यात या प्रसंगी दिनांक २१ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आदिवासी समाजाच्या डि-लिस्टिंग संदर्भात होणाऱ्या 21 नोव्हेंबर,2023 च्या नागपूर येथील विराट मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली.