आदिवासींबाबत लिखाण आणि संशोधनास वाव ; प्रा.डॉ. नरेश मडावी dr.naresh madawi
गडचिरोली(Gondwana university Gadchiroli),दि:१५ आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरुन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. समाजाचा विकास साधण्याचे तेच प्रभावी माध्यम आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भगवान बिरसा मुंडाचे ध्येय समोर ठेवून त्यांचा आदर्श जोपासावा. आपण केवळ जयंती, पुण्यतिथी निमित्त मर्यादित न राहता आदिवासींबाबत लिखाण आणि संशोधनास वाव आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक इतिहास विभाग तथा सिनेट सदस्य ,गोंडवाना विद्यापीठ डॉ. नरेश मडावी dr.naresh madawi यांनी केले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला . आदिवासी संशोधन केंद्र व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. विशेष उपस्थिती म्हणून संचालक क्रीडा विभाग ,गोंडवाना विद्यापीठ डॉ.अनिता लोखंडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अरूधंती निनावे उपस्थित होत्या.आदिवासी गौरव दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. ‘स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांचे योगदान’ हा स्पर्धेचा विषय होता.या स्पर्धेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .त्यातून जनसंवाद विभागाचे ऋषभ दुर्गे प्रथम क्रमांक तर राजेश्वरी कोटा यांनी
द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या वकृत्व स्पर्धेचे परीक्षक डॉ. नंदकिशोर मने होते.
डॉ.अनिता लोखंडे व डॉ.अरुंधती निनावे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन आदिवासी संशोधन केंद्र समन्वयक डॉ.वैभव मसराम यांनी तर आभार स्मृतिदिन समन्वयक पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ डॉ. नंदकिशोर मने यांनी मानले.