आता प्रत्येकाच्या हक्काच्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

97

आता प्रत्येकाच्या हक्काच्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

Now MLA Doctor Devraoji Holi will get the property card of everyone’s rightful land

आमगाव महाल येथे स्वामित्व योजने अंतर्गत जमिनीच्या ड्रोन सर्वेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते शुभारंभ

यामुळे जमिनीबाबतचे वाद, भांडण, तंटे, मारपीट इत्यादी संपुष्टात येणार

मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडणार

भूमी अभिलेख व ग्रामविकास विभागाचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली – Gadchiroli   गावा-गावांमध्ये जमिनीच्या लहान लहान कारणातून उद्भवणारे वाद, भांडण, तंटे, मारपीट आता संपणार असून प्रत्येकाच्या जमिनीचे ड्रोनमार्फत सर्वे करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आमगाव महाल येथील ड्रोन सर्वेक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी केले यावेळी चामोर्शीचे मा. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,संवर्ग विकास अधिकारी ,भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, गावच्या सरपंच जोस्त्नाताई गवारे, तथा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते भूमी अभिलेख व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीत्व योजना अंतर्गत ड्रोन सर्वेच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते आमगाव महाल येथून करण्यात आला. या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जमिनीचा मोजमाप करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या जमिनीचा मालकी हक्क प्रत्येकाला मिळणार असून यापुढे या लहान लहान बाबीसाठी होणारे वाद, भांडण, तंटे, मारपिट संपुष्टात येईल. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त करीत मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here