अवाजवी विद्युत देयके रद्द करा… शेतकर्यांचे आम कृष्णा गजबे यांना निवेदन
देसाईगंज:
देसाईगंज तालुक्यातिल जुनी वडसा येथील शेतकर्यांना कृषी पंपाचे विद्युत बिल अवाजवी लादल्याने ते देयके तात्काळ रद्द करा अश्या आशयाचे निवेदन आमदार कृष्णा गजबे यांना वडसा जुनी येथिल शेतकर्यांनी सादर केले.
निवेदन सादर करतांना शेतकरी म्हणाले की २०२० च्या पुरामुळे नदी काठावरील कृषीपंप असलेल्या शेतकर्यांच्या विद्युत मिटरमध्ये पाणि शिरल्याने विद्युत मिटर खराब झाले सदर चे मिटर बदलुन द्यावे अशी मागणि शेतकर्यांनी विद्युत विभागाला वारंवार केली माञ विद्युत विभागाने शेतकर्यांच्या या मागणिकडे सफशेल दुर्लक्ष करुण शेतकर्यांना अवाजवी विद्युत देयके पाठविली या वर्षी सुरळित पाऊस पडला नदिला पुर आल्याने नदिकाठाजवळील शेकडो हेक्टर पिक पुरामुळे नष्ट झाले असतांनाही विद्युत विभागाने शेतकर्यांनी विद्युत वापरली नसतांनाही १५ हजारांच्या वरचे विद्युत देयके पाठविली वारंवार तक्रार करुणही विद्युत विभाग तुघलकी धोरण वापरुन शेतकर्यांचे आर्थिक शोषण करित आहे या बाबिकडे क्षेञाचे आमदार म्हनुण लक्ष द्यावे व विद्युत विभागाला विद्युत देयके वापरानुसार आकारण्याच्या सुचना द्याव्या अश्या आशयाचे निवेदन शेतकर्यांनी आमदार गजबे यांना सादर केले