अवकाळी पावसाने झालेल्या शेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची शासनाकडे मागणी
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
दिनांक १९ ऑक्टोबर गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यामध्ये हलक्या व मध्यम धान पिकांची कापणी होत असून मागील काही दिवसांपासून अचानक वादळ वारा व पाऊस येत असल्याने दान पिकांची व रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेली आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस येत आहे. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या धानांची कापणी झालेली असून अनेकांनी धान रस्त्यावर वाळतही घातलेले आहेत. मात्र अचानक पाऊस येत असल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांच्या तातडीने पंच माचा व पंचनामे करावी व यथायोग्य आर्थिक मदत तातडीने करावे अशी मागणी केली आहे.